आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरहजर:जिल्ह्यात 11 आरोग्य केंद्रांचे मध्यरात्री ऑपरेशन; 13 डॉक्टर गैरहजर

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी आरोग्य केंद्रांच्या भेटीचे सत्र सुरु केले आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात मिशन सतर्क मोहीम राबवून पथकांनी एकाच वेळी ५ तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केली यात, १३ वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आले. इतर संवर्गातील ५० कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे.

राज्याचे आरोग्य आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य विभागातील कामकाजाला शिस्त लावायला त्यांनी सुरुवात केली आहे. आरोग्य केंद्रांच्या अचानक तपासणीच्या विशेषत: रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्रांच्या तपासणीच्या सूचना आहेत. बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी किती अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास आहेत याची तपासणी करण्यासाठी एकाच वेळी गेवराई, माजलगाव, केज, धारूर आणि पाटोदा तालुक्यात तपासणी केी. त्यामध्ये, २० पैकी ७ वैद्यकीय अधिकारी हजर आढळून आले. १७ पैकी केवळ तीन आरोग्य सहायक हजर होते, १४ पैकी ५ आरोग्य पर्यवेक्षिका तर ८ पैकी ६ औषध निर्माता हजर होते. २३ पैकी १३ परिचर हजर होते. १० पैकी १ ठिकाणी क्लर्क ही हजर होते. सर्व ठिकाणी रुग्णवाहिका चालक मात्र हजर आढळून आले. एकूण ७८ पैकी ५० जण गैरहजर होते.

या पथकांनी केली तपासणी
डीएचओ अमोल गिते यांनी निपाणी जवळा केंद्र तर, डॉ. एल. आर. तांदळे व डॉ.नरेश कासट यांनी केज तालुक्यात, डॉ. ज्ञानेश्वर निपटे व डॉ. अशोक आठवले यांनी पाटाेदा तालुक्यात, एडीएचओ डॉ. रौफ शेख व डॉ. अशोक गवळी यांनी गेवराई तालुक्यात, एडीएचओ डॉ. जयवंत मोरे व डॉ. पी. के. पिंगळे यांनी धारूर तर डॉ. संतोष गुंजकर यांनी माजलगाव तालुक्यात तपासणी केली.

अहवाल आयुक्तांना देणार
मुख्यालयी राहण्याबाबत सूचना सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या याची फेरतपासणी या मोहिमेतून केली गेली. यात गैरहजर असणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जाणार असून याचा अहवाल आयुक्तांना दिला जाणार आहे. - डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., बीड

बातम्या आणखी आहेत...