आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूचा साठा:अवैध वाळूचा लाखोंचा साठा जप्त; जागेत विनापरवाना बेकायदेशीर वाळूचा साठा

अंबाजोगाई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अहिल्यादेवी नगर मांडवा रोड येथे निसार शहा मीर शहा यांनी त्याच्या जागेत विनापरवाना बेकायदेशीर वाळूचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे, राजू वंजारे व अंबाजोगाई तहसील कार्यालय पथकाचे मंडळाधिकारी गोविंद जाधव, तलाठी फुलचंद सिरसाट, राम मगर, केदार यांनी कारवाई केली.

पथकाने या ठिकाणी छापे मारून १५५ ब्रास वाळू साठा ज्याची किंमत अंदाजे ६ लाख जप्त केली. निसार शहा मीर शहा, संजय सुराना, मैनोदीन निजाम शहा यांच्याविरुद्ध तहसीलदार कायदेशीर कारवाई करत आहेत, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

बातम्या आणखी आहेत...