आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेवली ग्रामस्थांनी माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी खंबीर ताकद उभी केली असून या गावचा सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी नव्हे तर कर्तव्य देखील आहे; असे म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी रेवली ग्रामस्थांनी केलेली संविधान सभागृह उभारण्याची मागणी मान्य केली आहे. सभागृहासह याठिकाणी साठवण तलाव, कब्रस्तानाची संरक्षक भिंत, शादी खाना, गावांतर्गत सिमेंट रस्ता, महादेव मंदिर सभागृह यांसह विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला.
परळी तालुक्यातील रेवली- वाका लाईट फीडरचे मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परळी मतदारसंघातील अतिरिक्त उसाचा प्रश्न लक्षात घेत डबघाईला आलेला अंबासाखर कारखाना चालवायला घेतला; आजपर्यंत सुमारे दीड लाख टन उसाचे गाळप त्याठिकाणी झाले. पुढेही ते सुरू राहील, अतिरिक्त असलेल्या उसाचे सर्व चालू कारखान्यांनी राजकारण बाजूला ठेऊन गाळप करावे, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी रेवलीचे सरपंच मनोहर केदार यांसह रेवली व वाका येथील ग्रामस्थांनी विजेचा प्रश्न सोडवल्याबद्दल मुंडे यांचे आभार मानले. कार्यक्रमास जि.प. गटनेते अजय मुंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य वाल्मीक कराड, शिवाजी सिरसाट, प्रा. मधुकरराव आघाव, मुंडे गुरुजी, लक्ष्मण पौळ, माणिक फड, कांता फड, सरपंच मनोहर केदार, उपसरपंच रत्नाकर कवडे, वैजनाथ कांदे, रामराव कांदे, कल्याण उंबरे, माऊली घोडके, राजाभाऊ निर्मळ, भागवत निर्मळ, शेषराव बनसोडे, ज्ञानदेव कांदे, मंचक मुंडे, उत्तम राठोड, सतीश आघाव, अंगद मुंडे, अंगद कांदे, विक्रम उंबरे, एकनाथ घुगे, बंडू मस्के, महारुद्र घुगे, दिनकर कराड, बाळासाहेब कराड, सुभाष कांदे, कल्पना आघाव, रेखा केदार, उषा उपाडेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.