आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण:अंबाजोगाईतून आणखी चौघे अटकेत; सीसीटीव्हीद्वारे शोध, शेकडो जणांच्या अत्याचाराचा दावा

अंबाजाेगाई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांत शेकडो जणांनी आपल्यावर विविध ठिकाणी अत्याचार केल्याचा दावा पीडितेने केला आहे. रविवारी या प्रकरणात अंबाजोगाई पोलिसांनी पुरवणी जबाब नोंदवला. त्यानंतर रविवारी रात्री शहरातून चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली.

अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. ती ८ वर्षांची असताना आईचे निधन झाले १३ व्या वर्षी तिचा बालविवाह झाला. दरम्यान, पतीकडूनही छळ होत असल्याने ती वडिलांकडे आली होती. मात्र, नियत बिघडलेल्या वडिलांकडूनही छेडछाड होत असल्याने जून २०२१ मध्ये मुलीने घरातून पळ काढून अंबाजाेगाई गाठले. बसस्थानकावर ती वास्तव्य करून भीक मागून जगत होती. दरम्यान, जेवण देण्याच्या आमिषाने तिच्यावर दोन जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, या प्रकरणात पीडितेने बालकल्याण समितीसमोर दिलेल्या जबाबात शेकडो जणांनी आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली. यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी मुलीचा पुरवणी जबाब नोंदवला आहे यात दोन पोलिसांवरही आरोप आहेत. दरम्यान, मुलीने दिलेल्या माहितीवरून रविवारी रात्री अंबाजोगाई पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.

१९ पर्यंत पोलिस कोठडी
दरम्यान, अटक केलेल्या चारही जणांना सोमवारी अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने १९ नोव्हंंेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सखोल तपास करण्यात येईल
पीडितेच्या माहितीनुसार, लॉज व शहरातील विविध ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची ओळख पटवली जात आहे. त्या दृष्टीने पथकेही तयार केली आहेत. या प्रकरणात सखोल तपास करण्यात येईल. - कविता नेरकर, अपर पोलिस अधीक्षक, अंबाजोगाई.

बातम्या आणखी आहेत...