आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील धक्कादायक घटना:अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी केला बलात्कार, पोलिसानेही केले लैंगिक शोषण

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी 17 वर्षांची असून तिचे बालपणीच लग्न झाले होते. एका पोलीस कर्मचाऱ्याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीची आठव्या वर्षीच आई वारली. त्यानंतर १३ व्या वर्षी तिचा वडिलांनी बालविवाह लावून दिला. मात्र, पतीकडून छळ होत असल्याने मुलगी पुन्हा वडिलांकडे आली. मात्र, वडिलांकडूनही छेडछाड होत असल्याने जून २०२१ मध्ये मुलीने घरातून पळ काढला होता. त्यानंतर ती अंबाजोगाई बसस्थानकावर राहत होती. जेवणाचे आमिष दाखवून दोन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाई पोलिसांत बालविवाह कायदा आणि बलात्कार करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा नोंद होता. दरम्यान, शुक्रवारी मुलीने बालकल्याण समितीला दिलेल्या जबाबात आपल्यावर सहा महिन्यांत शेकडो जणांनी अत्याचार केल्याचे सांगितले. शिवाय पीडिता गर्भवतीही आहे. त्यामुळे प्रकरण संवेदनशील बनले.

वडिलांनी घरात येऊ दिले नाही, बसस्थानकावर भीक मागितली
बालकल्याण समितीला दिलेल्या जबाबात पीडितेने सांगितले की, वडिलांनी तिला घरात येऊ दिले नाही. यानंतर ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बसस्थानकावर भीक मागू लागली. येथूनच तिच्या लैंगिक अत्याचाराला सुरुवात झाली. 400 हून अधिक लोकांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने समितीला सांगितले. तक्रार घेऊन ती अनेकवेळा अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गेली, मात्र पोलिसांनीही तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट एका पोलिसानेही तिच्यावर बलात्कार केला.

पुरावे जमा करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक
मुलीवर अत्याचार करणाऱ्यांची माहिती काढून पुरावे जमा करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून २ पुरुष व एक महिला अधिकाऱ्याचा यात समावेश आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनीही अत्याचार केल्याचा दावा मुलीने केला आहे. याचीही सखोल चौकशी केली जाईल. सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करू, असे एस. पी. राजा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बातम्या आणखी आहेत...