आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:वाळू चोरीची खोटी माहिती देत दिशाभूल

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या नशेत दोघांनी वाळू चोरी केली जात असल्याची माहिती फेक कॉल करून केज पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता फेक कॉल करणारे त्यांना बघून हसू लागले. शेवटी पोलिसांनी या दिशाभूल करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. केज तालुक्यातील लाखा येथे वाळू चोरी होत असल्याची माहिती ही ६ डिसेंबर रोजी दुपारी पोलिसांच्या मदतीसाठी असलेल्या ११२ क्रमांकावर फोन करून देण्यात आली. कॉल करणारे आश्रुबा भास्कर चव्हाण, शिवकुमार संदिपान घाडगे हे दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले. सहायक फौजदार रमेश शंकरराव सानप यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...