आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक‎:मधुमेह शिबिराला आमदार चव्हाण‎ यांची भेट; कामाचे केले कौतुक‎

गेवराई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह‎ पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल जीन‎ कॉर्पो. व शारदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त‎ विद्यमाने मोफत डायबिटीस तपासणी शिबीर‎ गेवराई येथे र.भ.अट्टल महाविद्यालयात सुरू‎ आहे. बुधवारी या शिबिराला मराठवाडा‎ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आ. सतीश‎ चव्हाण यांनी भेट देवुन माहिती घेतली. यावेळी‎ त्यांनी शारदा प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक‎ केले.

आमदार चव्हाण यांनी यावेळी शारदा‎ प्रतिष्ठान, शिवशारदा मल्टिस्टेट व र.भ.‎ अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने‎ विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त‎ शारदा स्वावलंबन अभियान अंतर्गत सुरु‎ असलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणाला‎ ही भेट दिली. या वेळी नर्गीस दत्त कॅन्सर‎ हॉस्पिटलचे समन्वयक नंदकुमार‎ नसे,सहसमन्वयक विद्या दुलांगे, ग्लोबल जीन‎ कार्पो, मुंबईचे समन्वयक विलास माने‎ यांच्यासह प्राचार्या डॉ. रजनी शिखरे आदी‎ मान्यवर उपस्थित होते. या शिबिरास‎ गेवराइकरांचा प्रतिसाद मिळत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...