आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामतदारसंघातील कामे आटोपून निवासस्थानाकडे जाताना मंगळवारी रात्री १२.३० वाजता माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडेंच्या कारला अपघात झाला. यात त्यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. बुधवारी दुपारी १२.३० वाजता मुंडे यांना परळी येथून रुग्णवाहिकेने लातूर येथे आणि तेथून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झाली दुर्घटना धनंजय मुंडे हे ३ जानेवारीला रात्री कारने परळीतील घरी जात होते. अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघाताची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून देताच बुधवारी समर्थक मोठ्या संख्येने जमले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.