आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:बीड जिल्ह्यात येऊन दाखवा, तुमचा चांगलाच सत्कार करू; मंत्री विजय वडेट्टीवार यांना आमदार सुरेश धस यांचे आव्हान

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात बोलताना आमदार सुरेश धस

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्री विजय वडेट्टीवार हे मनाला येईल ते बोलत आहेत. राज्य सरकार मात्र काहीच करत नाही. वडेट्टीवार फडतूस असून त्यांनी बीड जिल्ह्यात पाऊल ठेवून दाखवावे. पोलिस बंदोबस्तातच त्यांचा सत्कार केला नाही तर सुरेश धस नाही, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात साेमवारी सकाळी काढलेल्या विराट मोर्चाची वेळी त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यांनतर विराट मोर्चाला सुरुवात झाली.

शहरातील माळीवेस, धोंडीपुरा, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोडमार्गे हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यांनतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. नगर रोडवर दुतर्फी हजारो मोर्चेकरी लोटले होते. अामदार धस म्हणाले की, नाना पटोले जेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार घेतात, राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा निघते तेव्हा काेराेना हाेत नाही का? अधिवेशन घ्यायच्या वेळी मात्र अाठ दिवसांएेवजी दाेन दिवसांत ते अाटाेपले जाते. प्रश्न मांडायचे कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोर्चाच्या व्यासपीठावर भाजपचे गेवराई आमदार अॅड. लक्ष्मण पवार, माजी आमदार आर. टी. देशमुख, जि.प. माजी अध्यक्षा मीराताई गांधले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी. बी. जाधव, गंगाधर काळकुटे, संभाजी सुर्वे, स्वाभिमानी संघटनेचे प्रा. सचिन उबाळे, ऊसतोड कामगार संघटनेचे सुग्रीव सानप, अभिजित शेंडगे, गणेश उगले, अॅड.प्रकाश कवठेकर, माउली जरांगे, मनसेचे अशोक तावरे आदी उपस्थित होते.

मंगळसूत्र घातले, नवरी पळून गेली
राज्यातील जनतेने शिवसेनेला निवडून दिले. शिवसेनेचे लग्न आमच्या बरोबर झाले. आम्ही मंगळसूत्र घातले तेव्हा अचानक नवरी पळून गेली. आमदार धस म्हणाले की, फडणवीस यांनी दिलेले अारक्षण उच्च न्यायालयात टिकले. परंतु राज्य सरकारला ते सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. आरक्षण रद्द झाले तेव्हा जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलली.

बातम्या आणखी आहेत...