आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज मतदार संघातून जाणाऱ्या ५४८-ड या महामार्गाचे काम गुत्तेदाराच्या ढिसाळपणामुळे मागील २ वर्षापासून रखडल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा सूचना देऊनही गुत्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने आ. नमिता मुंदडा यांनी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी (दि.०२) बैठक घेतली. बैठकीत गुत्तेदारास तिसऱ्या पट्टीत खडसावत आ. मुंदडा यांनी त्याच्याकडून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणार असल्याचे लेखी पत्र घेतले. त्यानंतर आम्ही मतदार संघातील नागरिक काय काय हालअपेष्टा सहन करतो ते एकदा तुम्हीही अनुभवा असे म्हणत गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडने दुचाकीवरून फिरवले.
केज मतदार संघातून अंबाजोगाईतील भगवानबाबा चौक ते मांजरसुंबा हा ८२ किमीचा ५४८-ड महामार्ग जातो. आतापर्यंत गुत्तेदाराने रडत-पडत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. मात्र, अंबाजोगाईतील रिंग रोड, येळंबघाट येथील पूल, पुलाच्या बाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण, मार्गातील गावांना जोडणारे ॲप्रोच रस्ते यांचे काम अर्धवट आहे. अखेर, आ. मुंदडा यांनी बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, अभियंतायांची उपस्थिती होती. वेळोवेळी कामाचे देयके देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुत्तेदाराने या कामासाठीचे मनुष्यबळ दुसरीकडे स्थलांतरित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या आ. मुंदडा यांनी गुत्तेदारास खडसावल्यानंतर त्याने अधिक लांबीचे काम, ॲप्रोच रस्तेचे काम ३१ मे पर्यंत, रस्त्याचे राहिलेले छोटे तुकडे ३० जूनपर्यंत पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले.
गुत्तेदाराने दिलगिरी व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्यात येईल अशी दिली हमी
दरम्यान, माझ्या मतदार संघातील नागरिकांना होणारा त्रास तुम्हीही अनुभवा असे म्हणत आ. मुंदडा यांनी गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडने दुचाकीवरून फेरी मारण्यास भाग पाडले. खड्डे आणि धुळीच्या रस्त्याचे फेरी मारल्यानंतर गुत्तेदाराने दिलगिरी व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्याची हमी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.