आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२००८ मध्ये परळी बसवरील दगडफेक प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांच्यासह अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात परळी न्यायालयाने त्यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द केले असुन आता त्यांची जमानत केली जाणार असल्याने राज ठाकरे हे गुरुवारी ता. १२ रोजी शहरात येत आहेत.
मनसेच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी शहरात बैठक पार पडली. दरम्यान ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. २००८ च्या परळी येथील बसवरील दगडफेक प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट रद्द केले असुन आता त्यांची जमानत करुन घेतली जाणार आहे.या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी शहराच्या दौऱ्यात येत आहेत. शुक्रवार ६ जानेवारी २०२३ रोजी शहरातील चेमरी रेस्टहाऊस येथे मनसे नेते दिलीप धोत्रे,संतोष नागरगोजे,अशोक तावरे,वर्षा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होवुन हेलिपॅडची पाहणी करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष सुमंत धस,श्रीराम बादाडे,राजेंद्र मोटे,परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे आदी उपस्थित होते.
गोपीनाथगडाचे घेणार दर्शन मंगळवारी सकाळी दहा वाजता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तालुक्यातील पांगरी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथगड येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते मोटारीने परळी न्यायालयात येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.