आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसेचे रास्ता रोको आंदोलन

बर्दापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर फाटा येथे अंबाजोगाई-लातुर या महामार्गावर सोमवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरसकट पिकविमा,अनुदान मंजूर करा अन्यथा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून ऑफिसची तोडफोड करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस व युवा नेते अमोल चव्हाण नांदगावकर यांनी दिला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सततचा पाऊस, शंखी गोगलगाय व मोझॅक या सर्व रोगांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाचे मिळणारे अनुदान व विमा अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळाला पाहिजे यासाठी बर्दापुर फाटा येथे मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमंत धस, युवा नेते अमोल चव्हाण, तालुकाध्यक्ष ओमकार चव्हाण, मनसे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार, तालुका उपाध्यक्ष विलास शिंदे, मनसे तालुका अध्यक्ष नितीन परदेशी, राजेभाऊ, यशवंत, अमोल सुंदर चव्हाण, सोनू गव्हाणंेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...