आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी, ३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अंमलात आणले. त्यामुळे शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी केले. याविषयी डॉ.मुंडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने ‘सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ८ वर्षे’ या अभियानाचे आयोजन केले आहे.
याच माध्यमातून आपण जनतेसह संवाद करत आहोत. ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास’ हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा ‘बलशाली राष्ट्र’ अशी तयार झाली असून वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे. सन २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती होत आहे, असेही खासदार डॉ.मुंडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.