आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:महिलेस मारहाण करून विनयभंग; तिघांवर गुन्हा

केज11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका ५५ वर्षीय महिलेस शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याची घटना केज ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील ५५ वर्षीय महिला ही १८ जून रोजी रात्री ७ वाजेच्या समजावून सांगण्यासाठी घरी आली असताना वैजनाथ गोरख शिंदे, मच्छिंद्र गोरख शिंदे, रेखा सिद्धेश्वर शिंदे (रा. बेंगळवाडी ता. केज) या तिघांनी तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तर वैजनाथ शिंदे याने तिचा विनयभंग ही केला, अशी फिर्याद पीडितेने दिल्यावरून वैजनाथ शिंदे, मच्छिंद्र शिंदे, रेखा शिंदे या तिघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार उमेश आघाव, पोलिस नाईक बाळू सोनवणे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...