आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पत्नीवरही गुन्हा:सहकारी महिलेचा विनयभंग; माजलगावात पोलिसावर गुन्हा

माजलगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकारी महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा नोंद केला. दरम्यान, पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक म्हणून दबाव आणून धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पोलिस पत्नीवरही गुन्हा नोंदवला आहे. हरिश्चंद्र खताळ असे गुन्हा नोंद झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

खताळ हा माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ठाण्यातीलच एका महिला पोलिस कर्मचाऱ्याशी तो मागील काही दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने वागत होता. माझी इच्छा पूर्ण कर अन्यथा मी फाशी घेईल असे म्हणून त्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याला मेसेज केले. त्यांच्या घरीही तो गेला. तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला खताळ याच्या पोलिस असलेल्या पत्नीने रोखून पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक म्हणून दबाव टाकला. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात खताळ पती, पत्नीविरोधात गुन्हा नाेंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...