आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन अल्पवयीन चुलत बहिणींवर अत्याचार केल्याबद्दल आरोपीस अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाचे अप्पर सत्र न्या. दीपक खोचे यांनी दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. विकास नारायण केंद्रे (रा. सिरसाळा, ता. परळी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुली या आरोपीच्या गल्लीत राहणाऱ्या असून त्या नेहमीप्रमाणे आरोपीकडे ताक आणण्यासाठी गेल्या होत्या. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपीने पीडितांना घरात इतर कुणीही नसल्याचे संधी साधून रूममध्ये नेऊन दरवाजा बंद करून चाकूचा धाक दाखवून दोघी पीडितांची दोरीच्या साह्याने हात पायबांधून दोन चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्यचार केला.
याप्रकरणी सिरसाळा ठाण्यात गुन्हा नोंद केला गेला होता. हे प्रकरण आरोपीस तुरुंगात ठेवून चालवण्यात आले. प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक एस. ए. पाटील यांनी केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले व त्यांना अॅड. नितीन पुजदेकर व अॅड. इस्माईल गवळी यांनी मदत केली. तसेच पोलिस पैरवी म्हणून पोलिस कर्मचारी गोविंद कदम व विष्णू नागरगोजे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.