आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न:मैत्रिणीच्या वडिलांनीच केला विनयभंग, अभ्यासासाठी मैत्रिणीच्या घरी गेली होती मुलगी

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रिणीच्या घरी अभ्यास करण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलीचा मैत्रिणीच्या वडिलांनी अभ्यास घेण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. या प्रकारामुळे मनावर परिणाम झाल्याने त्या पीडित मुलीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी शनिवारी रात्री अंबाजोगाई शहर ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

दीपक शरणाप्पा बाबजे (रा. अंबिका सोसायटी, अंबाजोगाई) असे त्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक बाबजेची मुलगी आणि त्यांची मुलगी मैत्रिणी आहेत. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी

सव्वासहा वाजेच्या सुमारास पीडिता तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बाबजे याच्या घरी गेली. या वेळी आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत दीपकने तिचा विनयभंग केला. या वेळी पीडिता जोरात ओरडल्याने दीपक बाजूला सरकला. आवाज ऐकून दीपकची मुलगी धावत आली आणि त्यावेळी भेदरलेली पीडिता घरी निघून आली. तिने २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी तिची परिस्थिती पाहून तिच्या आईने तिला उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे अतिदक्षता विभागात उपचारानंतर पीडिता ३०ऑगस्ट रोजी शुद्धीत आली. या वेळी आईने विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तक्रारीवरून दीपक बाबजेवर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पिंक पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक वैशाली पेठकर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...