आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:अरणवाडी तलाव सांडवा काम करण्यास पावसाळ्यानंतर मुहूर्त; गतवर्षी दोन वेळा फोडला होता सांडवा

धारुर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरणवाडी साठवण तलावाचा बांधण्यात आलेला सांडवा गतवर्षी फोडून दिला होता परंतु या तलावातील पाणी आता ७० टक्के पर्यंत आले आहे. यामध्ये सांडव्याच्याचे काम बोगस करण्यात आल्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने तलावास धोका निर्माण झाला होता. काळी माती टाकून सांडवा बुजला तरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे फोडलेला सांडवा पावसाळ्यापूर्वी तोडण्यास अधिकाऱ्यांची मात्र टाळाटाळच दिसून येत आहे. बोगस कामाचे या वरून पितळ उघडे पडले तरीही वरिष्ठ अधिकारी मात्र गप्प आहेत.

खामगाव - पंढरपूर रस्त्यावर अरणवाडी साठवण तलाव आहे. हा साठवण तलाव पंधरा वर्षा नंतर गतवर्षी पूर्ण झाला होता. पहिल्याच वर्षी तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने अधिकाऱ्यांना तलाव फुटण्याचा धोका होण्याची भीती निर्माण झाली होती. अधिकाऱ्यांनी तलावाचा सांडवा फोडून पाणी काढून दिले होते. नंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या मागणीनंतर हा फोडलेला सांडवा बांधण्यात आला होता. परंतु परतीच्या पावसाने पुन्हा सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पुन्हा सांडावा फोडला गेला. अद्यापही सांडव्याची ही भिंत बांधलेली नाही. तलावातील पाणी ७० टक्के राहील्याने सांडव्याची आतील बाजू उघडी पडली आहे.

पाझर थांबवण्याचे प्रयत्न
तलावाच्या सांडव्याच्या भिंतीतून होणारा पाण्याचा पाझर टाळ्या साठी मागील दोन दिवसा पासून अधिकाऱ्यांनी सांडव्याची आतील बाजू उकरून त्यात काळी माती भरली आहे तर बाहेरूनही सांडव्याच्या भिंतीला सिमेंटने लेप दिला आहे. इतके करुनहीपाण्याचा होणारा भिंतीतून विसर्ग सुरुच आहे. या प्रकारामुळे कंत्राटदाराने केलेल्या बोगस कामाचे पितळ उघडे पडले आहे. काही केल्याने पाझर कमी होत नसल्याने फोडलेला सांडवा बांधण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. आता यंदाचा पावसाळी असाच जाण्याची चिन्हे असून पुढील वर्षीच सांडव्याची भिंत बांधण्याची विभागची मानसिकता दिसत आहे.

पावसाळ्यानंतर सांडवा बांधण्याच्या वरिष्ठांकडून सूचना
तलावात सध्या ७० टक्के पाणी साठा आहे. तलावाला धोका होवू नये म्हणून काळी माती उपलब्ध केली आहे . सांडव्याची भिंतही सिमेंटने लेप केले आहे. त्या मुळे पाणी गळती कमी आहे. वरिष्ठांनी पावसाळ्यानंतर सांडवा बांधण्याचे सुचविले आहे.- मुकेशसिंह चव्हाण, उप अभियंता, सा.बां. विभाग, बीड

बातम्या आणखी आहेत...