आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील फुले पिंपळगाव येथे श्री लक्ष्मी आई यात्रा महोत्सवानिमित्त महाराष्ट्र केसरी अस्लम काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या जंगी कुस्त्या साठी पैलवानांची तोबा गर्दी झाली होती. या ठिकाणी सोमवारी (ता.२) दुपारी ४ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत नामवंत पैलवानांच्या दंगली सुरू होत्या. शंभराहून अधिक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
फुलेपिंपळगावात श्री लक्ष्मीआई यात्रा महोत्सवानिमित्ताने गावातून तोफा वाजवत हलगी वाजवत मिरवणूक काढण्यात आली. लक्ष्मीआईला गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आला. त्यानंतर पुजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दुपारी ४ वाजता जंगी कुस्त्यांना महाराष्ट्र केसरी आसलम काझी, पैलवान बाळासाहेब आवारे, महेबुब शेख, गंगाधर चौरे, गावचे सरपंच दशरथ उमरे, उपसरपंच रामेश्वर कोरडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, पत्रकार धनंजय माने, फुलगे, सचिव हरीभाऊ सवणे, अकुंशराव शिंदे, प्रल्हाद सोंळके, पैलवान हमीद पठाण, पैलवान समद पठाण, मनोज फरकके, आण्णा गायकवाड, श्रीराम खंडागळे, विठ्ठल गायकवाड, भानुदास खंडागळे, भिकचंद साळवे, अरूण शिंदे, आण्णासाहेब फुलगे, सुधाकर शिंदे, पत्रकार पठाण यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.