आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर:औरंगाबाद परिक्षेत्रात सर्वाधिक लाचखोर,गतवर्षीच्या तुलनेत 30 सापळे वाढले..!

बीड (अमोल मुळे)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळेही तक्रारी वाढल्या

राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक सॅनिटायझरने हात धुण्यात व्यग्र आहेत, तर दुसरीकडे लाचखोरही वाढले असून तेही संधी मिळेल तिथे ‘हात धुऊन’ घेत आहेत मात्र, एसीबीने नागरिकांत निर्माण केलेल्या विश्वासाने लाचखोरीच्या तक्रारींत वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ ते ६ एप्रिल २०२१ या काळात राज्यात गतवर्षीच्या तुलनेत ३१ ट्रॅप जास्त झाले आहेत. यापैकी औरंगाबाद परिक्षेत्रात ३० ट्रॅप अधिक आहेत. सन २०२० मध्ये औरंगाबाद परिक्षेत्रात २२ सापळे झाले होते. हीच संख्या यंदा ५२ इतकी आहे. उल्लेखनीय हे की, मार्च महिन्यात राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४७ टक्के अधिक कारवाया झाल्या आहेत तर, पहिल्या तिमाहीतही गतवर्षीच्या तुलनेत १६% कारवाया अधिक आहेत.

वाढलेल्या तक्रारी आणि वाढलेल्या कारवायांबाबत लाचलुचपत विभागाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांना विचारले असता ते म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेहमीच जनजागृतीवर भर दिला आहे. यासाठी १०६४ हा टोल फ्री क्रमांकही आहे. शिवाय, आमचे अधिकारीही नागरिकांच्या संपर्कात असतात. विशेष म्हणजे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक अशा वर्ग १, वर्ग २ पदांवरच्या अधिकाऱ्यांवरही मागील काही दिवसांत कारवाया झाल्या आहेत त्यामुळे अधिकारी मोठा असला आणि एसीबीकडे तक्रार केली तरी त्यांच्यावर कारवाई होतेच हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. त्यामुळे नागरिकांकडूनही तक्रारींत वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला नेहमीच लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

कोरोनामुळेही तक्रारी वाढल्या
एसपी राहुल खाडेंनी आणखी एक निरीक्षण नोंदवले आहे ते असे की, कोरोनाच्या काळामुळेही तक्रारींत वाढ झाली आहे. लॉकडाऊन, बाजारपेठ थंड असल्याचा परिणाम लोकांच्या जीवनमानावर झाला आहे. लोकांकडे पैसे नाहीत, जे आहेत ते पुरवून वापरावे लागतात. कारण ही परिस्थिती कधी संपेल हे सांगता येत नाही. अशा काळात जर तुमची कुणी पैशांसाठी अडवणूक करत असेल तर नक्कीच तुम्ही पैसे देणार नाही, तुम्हाला राग येईल, नियमात असूनही काम होत नाही याचा संताप येईल आणि मग लोक तक्रारींसाठी एसीबीकडे येतात. विशेष म्हणजे दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे.

परिक्षेत्रातील टॉप पाच कारवाया
1 श्रीकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी, माजलगाव ~65 हजार लाच घेताना अटक
2 किशोर देशमुख, अपर तहसीलदार, औरंगाबाद 1.50 लाख लाच घेताना अटक
3 किरण सुरेश घोटकर, स्थानिक निधी लेखा परीक्षक, बीड ~20 हजार लाच घेताना ताब्यात
4 नारायण मिसाळ, गटविकास अधिकारी, पं.स.बीड ~37 हजार लाच घेताना अटक

बातम्या आणखी आहेत...