आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:राज्यातील सर्वाधिक सदस्य परळीत व्हावेत : धनंजय मुंडे

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहराच्या वतीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्य मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मुंडे यांनी पक्षाचे राज्यात सर्वाधिक सदस्य परळी तालुक्यातून व्हावेत, असा मनोदय व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संघटनात्मक आढावा विषद करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच “राष्ट्रवादी आपल्या दारी” या अभियानाची घोषणा त्यांनी याप्रसंगी केली. तसेच राष्ट्रवादी सदस्य नोंदणीचे बुक पदाधिकाऱ्यांना वितरीत करण्यात आले. राज्यात सर्वाधिक सदस्य परळी शहरात होतील, असा मनोदय यावेळी सर्वांनी व्यक्त केला. अतिशय उर्जादायी आणि उत्स्फूर्त पार पडलेल्या या बैठकीस विविध सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...