आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:बिंदूसरा नदीच्या संवर्धनासाठी सरसावले;‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद‎ शर्मा यांनी नदी संवर्धनासाठी ‘नदीला‎ जाणून घेऊया’ नावाचे जनजागृती‎ अभियान सुरू केले असुन त्यांनी‎ मांजरा नदीकाठच्या लोकांसोबत‎ संवाद सुरू केला आहे. मात्र‎ जिल्हाधिकारी ज्या बीड शहरात‎ राहतात, त्या बिंदूसरा नदीची बकाल‎ अवस्था झालेली असुन त्या बिंदूसरा‎ नदीसोबत संवाद साधायला हवा.

या‎ मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.‎ गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली‎ सोमवारी बीड येथील जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात‎ आले.‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर‎ सोमवारी करण्यात आलेल्या‎ आंदोलनात शेख युनुस , मुबीन शेख,‎ सय्यद आबेद, शेख मुस्ताक, बलभीम‎ उबाळे, अरूण खेमाडे आदी सहभागी‎ झाले होते. यावेळी निवासी‎ उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, बीड‎ नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निता‎ अंधारे यांना निवेदन देण्यात आले.‎

नदीबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे‎ नदी शुद्ध पाण्याचा स्तोत्र असून‎ नदीशिवाय जीवन नाही, नदीला‎ वाचवण्याची गरज आहे. अतिक्रमण,‎ शोषण व प्रदुषण या तीन कारणांचा‎ अभ्यास करण्यासाठी मांजरा नदीत‎ अभियान राबवणारे जिल्हाधिकारी‎ राधाबिनोद शर्मा हे बिंदुसरा‎ नदीपात्रातील अतिक्रमण, अस्वच्छता‎ व दुषित पाणी याबद्दल दुर्लक्ष करत‎ असल्याचा आरोप आंदोलकांनी‎ केला आहे.कोणीच बिंदुसरा नदीच्या‎ संवर्धनासाठी पुढे यायला तयार नाही.‎ जिल्हाधिकाऱ्यांनी संवर्धनासाठी‎ पुढाकार घ्यावा, म्हणून हे आंदोलन‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...