आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:कुख्यात संतोष गायकवाडवर‎ केली "एमपीडीए''ची कारवाई‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोरी, घरफोडी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे‎ अशा गंभीर गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार संतोष‎ गायकवाड (रा. रामनगर, तलवाडा) यांच्यावर‎ एमपीडीए नुसार कारवाई करण्यात आली असून‎ रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला‎ गजाआड केले.‎ तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील रामनगर‎ येथील संतोष ओमकार गायकवाड याच्यावर‎ चोरी, घरफोडी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे‎ असे गंंभीर स्वरूपाचे डझनभर गुन्हे नोंद आहेत.‎

त्याच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव तलवाडा‎ पोलिसांनी पाठवला होता. उपविभागीय‎ अधिकारी स्वप्निल राठोड यांनी अहवाल‎ पाठवला होता. एस पी ठाकूर यांनी जिल्हा‎ दंडाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठवला होता.‎ जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एमपीडीएचे आदेश‎ दिले होते. रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पी‎ आय सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली‎ पीएसआय श्रीराम खटावकर, कर्मचारी अशोक‎ दुबाले, राहुल शिंदे, नसीर शेख यांनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...