आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:श्री. संत नामदेव महाराज सहकारी पॅनल; चिंचोलीमाळी सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील चिंचोलीमाळी - सारुकवाडी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री. संत नामदेव महाराज सहकारी पॅनलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले आहेत. या भाजपच्या ताब्यात आलेल्या सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा भाजपचे युवानेते विष्णू घुले यांनी सत्कार केला.चिंचोली ( माळी ) येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे, आ. नमिता मुंदडा, जेष्ठ नेते रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपाचे जेष्ठ नेते सुनील गलांडे, सरपंच सुनील देशमुख व राम मेजर राऊत यांच्या नेतृत्वाखाली श्री. संत नामदेव महाराज सहकारी पॅनल उभा करण्यात आला होता. या पॅनलच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारली असून पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले.

या विजयी उमेदवारांमध्ये अशोक दत्तात्रय देशमुख, अरुण चंद्रशेखर काळे, मलिकार्जून दिगंबर गलांडे, महादेव किसन गिते, जयप्रकाश बब्रूवान नखाते, दीलीप शामराव बर्डे, रफिक इस्माईल शेख, युवराज सुभाष मगर, भारत भाऊराव गालफाडे, आबासाहेब भिमराव केदार, सुरेखा राजाभाऊ नखाते, महानंदा महादेव शिंदे, बालाजी विष्णू राऊत यांचा समावेश आहे. तर भारत गालफाडे हे सर्वाधिक मताने विजयी झाले.

बातम्या आणखी आहेत...