आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणीबाबत:अंबाजगाईमधील मुडेगाव; राडी तांडा येथे बीजप्रक्रिया प्रशिक्षण

अंबाजोगाई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खोडमासी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीजप्रक्रिया करावी

पिकाची फेरपालट न केल्याने खरीप हंगामात सोयाबीनवर खोडमाशी, रसशोषक किडी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कीड-रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी मुडेगाव व राडी तांडा येथे कार्यशाळा घेऊन बीजप्रक्रियेचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.

सोयाबीनचे बी हाताने चोळू नये व जास्त ओले करू नये तसेच बियाण्यांची टरफले निघणार नाहीत याची काळजी घ्यावी. बीजप्रक्रिया करताना कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या लेबल क्लेम असलेल्या निविष्ठांचा वापर करावा व अनावश्यक निविष्ठांचा वापर टाळून उत्पादन खर्च कमी करावा, शंभर मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाने पेरणी व पोकरांतर्गत बीजोत्पादन व रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान अनुदानाची माहिती देऊन प्लास्टिकच्या ताडपत्रीवर सोयाबीन बियाणे घेऊन बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

अशी करा सोयाबीन बीजप्रक्रिया
अझॉक्सिस्ट्रोबिन २.५ टक्के अधिक थायोफिनेट मिथाईल ११.२५ टक्के अधिक थायामेथोक्सम २५ टक्के एफएस हे सर्व घटक एकत्रित असलेल्या संयुक्त बुरशीनाशक व कीटकनाशकाची १० मिली प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यामुळे वेगवेगळे बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे अल्प खर्चात बीजप्रक्रिया होईल.

वरील घटक बाजारात उपलब्ध नसतील तर कार्बोक्सीन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७. टक्के डीएस या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम किंवा पेनफ्लुफेन १३.२८% अधिक ट्रायफ्लोक्सस्ट्रोबिन १३.२८ टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची १ मिली किंवा थायोफिनेट मिथाईल अधिक पायराक्लोस्ट्रोबिन या संयुक्त बुरशीनाशकाची ३ मिली प्रमाणे बीजप्रक्रिया करावी, त्यानंतर थायोमिथोक्साम ३० टक्के एफएस या कीटकनाशकाची १० मिली याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू संवर्धक ब्रेडिरायझोबीयम जापोनिकम २० मिली व स्फुरद विरघळवणारे जिवाणू २० मिली या प्रमाणात बियाण्यास लावावे. वर दिलेल्या सर्व औषधांचे प्रमाण हे १ किलो बियाण्यासाठी आहे. वर नमूद केलेल्या रासायनिक बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची बीजप्रक्रिया पेरणीच्या ४ ते ५ दिवस आधी केली तरी चालेल. परंतु, जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया पेरणीच्या २ ते ३ तास आधी करावी, असे तंत्रज्ञान समन्वयक उपविभागीय कृषी अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी सांगितले.

कार्यशाळेला यांची प्रामुख्याने उपस्थिती
कार्यशाळेला धीरज घाडगे, दसरथ करंजकर, दत्ता उपाडे, दिलीप जगताप, लक्ष्मण पाटील, राजेभाऊ जगताप, सतीश करंजकर, पांडुरंग जगताप, सतीश जगताप, बजरंग जगताप, बाळासाहेब जगताप, लक्ष्मण जगताप, दत्तू जगताप शिवाजी जगताप, विद्याधर जगताप, मीरा जगताप, अमोल जगताप, अशोक राठोड, सहदेव राठोड, मच्छिंद्र चव्हाण, पांडुरंग राठोड, गजानन जाधव, विक्रम राठोड आदी शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...