आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंगणात मैत्रिणीबरोबर खेळत असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवत नदीवर नेऊन मुकादम तरुणाने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. चार वर्षांपूर्वी दहिफळ वडमाउली (ता. केज) येथे घडलेल्या या घटनेतील आरोपीला अंबाजोगाई येथील अपर सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी गुरुवारी दहा वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिक्षेनंतर त्याची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. अण्णा ऊर्फ भाऊराव प्रभाकर गदळे (३७, रा. दहिफळ वडमाउली, ता. केज, जि.बीड) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. अण्णा उर्फ भाऊराव प्रभाकर गदळे या मुकादमाने दारूच्या नशेत ३० ऑक्टोबर २०१८ रोजी अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना धान्याचे पोते शिवण्यास मदत करण्याचा बहाणा केला होता. मुलीला नदीकडे खेकडे धरायला जाऊ असे आमिष दाखवून शेतात नेत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.