आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:नगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग; आज प्रारूप प्रभाग रचनेच्या आक्षेपांवर होणार सुनावणी

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेत एमआयएम जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शेख शफिक, शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते हाजी अब्दुल खालेक पेंटर आणि सामाजिक कार्यकर्ते इलियास टेलर यांनी एकत्रितरीत्या दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी (२१ जून) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. बीड नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना तयार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाले आहे.

स्थानिकच्या अधिकाऱ्यांनीच ही रचना कुणाच्या तरी राजकीय फायद्याच्या दृष्टीने तयार केल्याचा आरोप करत एमआयएम जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शेख शफिक, हाजी अब्दुल खालेक पेंटर आणि इलियास टेलर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने आज इतर याचिका बंद करत फ्रेश याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने शफिकभाऊ, खालेक पेंटर आणि इलियास टेलर यांनी फ्रेश कॉमन याचिका दाखल केली असून हायकोर्टाने त्यावर २१ जून रोजी सुनावणी ठेवली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. सूर्यवंशी हे काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...