आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:अट्टलमध्ये भित्तिपत्रक; सेल्फी विथ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, विजेत्या स्पर्धकांना जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी, बीड यांच्या वतीने पारितोषिके

गेवराई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात India @75 अंतर्गत रक्तदान, क्षयरोग जागृती भित्तिपत्रक आणि सेल्फी विथ स्लोगन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले व जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी साधना गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व समुपदेशक राजश्री हिवरेकर उपजिल्हा रुग्णालय, गेवराई यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना विभागअंतर्गत रेड रिबन क्लबच्या वतीने एचआयव्ही जनजागृती, स्वेच्छा रक्तदान या विषयावर पोस्टर स्पर्धा, एचआयव्ही - टीबी जनजागृती यासंदर्भात शॉर्ट व्हिडिओ फिल्म तयार करणे, स्वेच्छा रक्तदान या विषयावर शॉर्ट व्हिडिओ फिल्म तयार करणे आणि सेल्फी विथ स्लोगन (फोटो) स्पर्धा या चार प्रकारातील स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ.समाधान इंगळे, डॉ. राहुल माने, प्रा. शरद सदाफुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यापैकी भित्तीपत्रक स्पर्धेत : प्रथम पारितोषिक - मानसी ज्ञानेश्वर दिसागज (बी.एस्सी. प्रथम वर्ष), द्वितीय पारितोषिक - लाड दिपाली शेषराव आणि पाठक आरती प्रमोद (बी.एस्सी. द्वितीय वर्ष) यांना विभागून देण्यात आले, तर तृतीय पारितोषिक- काकडे कोमल एकनाथ (बी.एस्सी. प्रथम वर्ष) या विद्यार्थिनीने पटकाविले. सेल्फी विथ स्लोगन या स्पर्धेत प्रथम पारितोषिक - दुरांडे विक्रम भागवत (बी.ए. तृतीय वर्ष),द्वितीय पारितोषिक - बाबरे लक्ष्मण अजिनाथ (बी.एस्सी. प्रथम वर्ष) आणि तृतीय पारितोषिक सुळ सोमेश्वर रंगनाथ (बी.एस्सी‌ प्रथम वर्ष) या विद्यार्थ्याने पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी, बीड यांच्या वतीने पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...