आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साळेगावजवळ थरार:डोळ्यांत मिरची पूड टाकून जावयाने केला सासूचा खून; मेहुणाही जखमी, दुचाकीहून पसार

केज12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनीजवळ्यात सापडली दुचाकी; दुसरा साथीदार कोण?

भेटण्यासाठी आलेल्या सासूच्या डोळ्यांत जावयाने मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने मानेवर आणि गळ्यावर सपासप वार करून निर्घृणपणे खून केला. तर या मारहाणीत सासूसोबत आलेला चुलत मेहुणाही जखमी झाल्याची ही थरारक घटना केज-कळंब महामार्गावर साळेगावजवळील एका हॉटेलजवळ रविवारी ( दि. २५ ) दुपारी घडली. जखमी मेव्हण्यावर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जावई हा सासूने आणलेल्या दुचाकीवरून फरार झाला आहे.

साळेगाव येथील अमोल वैजनाथ इंगळे याची पत्नी २ महिन्यापूर्वी प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. तर रविवारी सकाळी अमोल याची सासू लोचना उर्फ सुलोचना माणिक धायगुडे ( ४०, रा. धायगुडा पिंपळा ता. अंबाजोगाई) या पुतण्या अंकुश दिलीप धायगुडेसह दुचाकीने जावई अमोल इंगळे यास भेटण्यासाठी साळेगाव येथे आले होते. मात्र जावई अमोल याची भेट न झाल्याने ते दुपारी १२ वाजता परत गावाकडे निघाले होते. केज-कळंब रस्त्यावरील साळेगावजवळील दिलीप मेडकर यांच्या हॉटेलसमोर अमोल इंगळे त्यांना भेटला.

त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला त्यानंतर अंकुश धायगुडे यांच्या दुचाकीवर बसून लोचना अंबाजोगाईकडे जाण्यास निघाल्या. त्याचवेळी अमोलने त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून कोयत्याने अंकुश धायगुडे याच्या हातावर वार केले. या झटापटीत लोचना धायगुडे या दुचाकीवरून खाली पडल्या. अमोल इंगळे याने सासू लोचना यांच्या मानेवर व गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले. हे वार चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या हातावरही चार- पाच खोलवर वार झाले. यात लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस नाईक अशोक नामदास, अमोल गायकवाड, मंगेश भोले, दिलीप गित्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सोनीजवळ्यात सापडली दुचाकी; दुसरा साथीदार कोण?
सासू लोचना यांचा खून करून अमोल इंगळेने धायगुडेंनी आणलेल्या दुचाकीवरून पलायन केले होते ही दुचाकी सोनीजवळा येथे सायंकाळी सापडली. खुनावेळी अमोलसोबत आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती जखमी अंकुश धायगुडे याने पोलिसांना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...