आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:नागापुरात  कुऱ्हाडीचे घाव घालुन दोन सख्या भावांचा खून, जुन्या वादातुन भावकीतील व्यक्तीनेच काढला काटा

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भावंडाचा त्यांच्याच भावकीतील परमेश्वर साळुंके याच्या बरोबर पंधरा दिवसापूर्वी वाद झाला होता

भावकीतील जुन्या भांडणावरून दोन संख्या भावांचा कुऱ्हाडीचे घाव घालुन खुन करण्यात आल्याची घटना बीड तालुक्यातील नागापुर गावात घडली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम साळुंके, लक्ष्मण साळुंके रा.नागपूर ता.बीड अशी खुन झालेल्या भावांची नावे आहेत.

बीड तालुक्यातील नागापूर येथील राम साळुंके व लक्ष्मण साळुंके या दोन भावंडाचा त्यांच्याच भावकीतील परमेश्वर साळुंके याच्या बरोबर पंधरा दिवसापूर्वी वाद झाला होता. जुन्या भांडणावरुन हा वाद झाला होता. दोन दिवसापूर्वी परमेश्वर साळुंके याने पुन्हा दोघांना शिवीगाळ केली होती. ही शिवीगाळ का केली अशी विचारणा करण्यासाठी राम आणि लक्ष्मण सोळंके हे दोघे भाऊ परमेश्वरकडे गेले होते. यावेळी परमेश्वर साळुंके याने कुऱ्हाडीचे घाव घालुन राम, लक्ष्मण साळुंके यांचा खून केला. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनाच्या घटनेमुळे नागापुर येथे खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...