आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:आष्टी तालुक्यात पत्नीचा खून; तिघांवर गुन्हा, पतीला अटक

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेलेली पत्नी घरी आली. याचा राग मनात धरून पती, सासरे, दीर यांनी तिला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मनीषा ऊर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले (२३) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील विवाहिता मनीषा ऊर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले या काही दिवसांपूर्वी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. बुधवारी त्या घरी आल्या. याच कारणावरून घरात वादाला सुरुवात झाली. पती, सासरा, दिराने संगनमत करून मनीषा ऊर्फ सोनाली वाघुले यांना सायंकाळी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ११ मे रोजी घडली. याप्रकरणी मृत महिलेची बहीण अश्विनी रमेश राळेभात यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात पती बाबासाहेब अशोक वाघुले, सासरा अशोक नारायण वाघुले, दीर प्रकाश अशोक वाघुले यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत. आरोपी पतीला अटक करण्यात आली. तर सासरा व दीर फरार आहेत.

बातम्या आणखी आहेत...