आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमच्या शेतातील हरभरा का काढत आहेत, असे म्हणत चौघांनी एका दाम्पत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघांच्या डोक्यात व हातापायावर कोयत्याने सपासप वार केल्याने दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. यात पतीची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सोलापूरला हलवले आहे. होळ (ता. केज) येथील शेतकरी दत्ता रामराव घुगे (४२), त्यांची रुक्मिण दत्ता घुगे (३५) हे दोघे ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या त्यांच्या शेतात हरभरा पीक काढीत होते.
याचवेळी संभाजी सिताराम घुगे, ऋषिकेश संभाजी घुगे, ज्ञानेश्वर संभाजी घुगे, सोनेराव बाबुराव राख हे चौघे संगनमत करून हातात कोयते घेऊन त्यांच्याजवळ आले. त्यांनी तुम्ही आमच्या शेतातील हरभरा पीक का काढता असे म्हणत संभाजी घुगे याने दत्ता घुगे यांच्या छातीत दगड घातला. तर ऋषिकेश घुगे, ज्ञानेश्वर घुगे, सोनेराव राख या तिघांनी दत्ता घुगे यांच्या डोक्यात, हातावर, पायावर, गुडघ्यावर कोयत्याने सपासप वार करीत गंभीर जखमी केले. त्यांची पत्नी रुक्मिण घुगे यांच्यावरही कोयत्याने वार केले. करीत गंभीर जखमी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.