आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी तत्पर असावे; भोपा येथील कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष उजगरेंचे प्रतिपादन

दिंद्रुड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण सर्व भारतीय आहोत. भारतीय संविधानातील समता, स्वतंत्र, बंधुता व न्याय या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी आपणच सदैव तत्पर असले पाहिजे. कोणी माणसा -माणसात भेद निर्माण करुन धर्म जातीयतेचे विष पसरवण्याचे काम करत असेल तर अशा प्रवृत्तींना रोखणे हे भारतीय म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन उजगरे यांनी केले.

भोपा (ता.धारुर) येथे रमजान ईद निमित्ताने नुरानी मस्जिद न्यू कमिटी व मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने हिंदू-मुस्लिम-सिख- ईसाई, हम सब भाई भाई असा संदेश देत सर्व गावकऱ्यांना शीर खुर्मा पिण्यासाठी आमंत्रित केले. या कार्यक्रमाप्रसंगी उजगरे बोलत होते. वंचित बहुजन आघाडी तालुका संघटक शेख अहमद, दिंद्रुड ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे, कल्याण वाघचौरे, पोलीस पाटील सत्यनारायण वाघचौरे, राठोड, डोळे, मुजमुले, पद्माकर, गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. आप-आपसात बंधुभाव, एकात्मता निर्माण करुन शांतता प्रस्थापित केली पाहिजे, असे आवाहनही उजगरे यांनी केले.

याप्रसंगी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. तसेच ईदच्या निमित्ताने रोजा करणाऱ्या चिमुकल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन महादेव उमाप यांनी केले तर शेख मन्सूर, शेख हजू, शेख शकील तसेच टिपू सुलतान युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...