आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराजवळच मृतदेह आढळा:नागापूरमध्ये वृद्धाचा‎ संशयास्पद मृत्यूचे गुढ‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील नागापूर बुद्रूक‎ येथे ६० वर्षीय वृद्धाचा‎ घराजवळच मृतदेह आढळून‎ आला. दरम्यान, रात्रीपासून‎ बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा‎ मृतदेह सकाळी घराजवळच‎ आढळल्याने खळबळ उडाली‎ असून घातपाताचा संशय व्यक्त‎ होत आहे.

या प्रकरणी पोलिसात‎ अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात‎ आली आहे. दुसऱ्या दिवशीही या‎ मृत्यूचे गुढ कामय होते.‎ कल्याण शंकर खराडे (६२)‎ असे मृताचे नाव आहे. ते‎ रविवारी रात्री घरातून बाहेर‎ पडले होते रात्रभर ते घरी आले‎ नाहीत सकाळी सहा वाजेच्या‎ दरम्यान घराजवळच त्यांचा‎ मृतदेह आढळून आला. त्यांच्या‎ डोक्यात आणि चेहऱ्यावर‎ जखमा आढळून अल्याने‎ घातपाताचा संशय व्यक्त होत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...