आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्त टळला:नगर-आष्टी पॅसेंजर 23 सप्टेंबरला धावणार

आष्टी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नऊ महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात नगर-आष्टी रेल्वे मार्गाच्या चाचणीनंतर ३ फेब्रुवारीला प्रवासी रेल्वे सुरू करण्याचा ठरलेला पहिला मुहूर्त लांबणीवर पडला. त्यानंतर खुद्द रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ७ मे २०२२ रोजी रेल्वे सुरू करण्याचे जाहीर करूनही ती सुरू न झाल्याने दुसराही मुहूर्त टळला.

शेवटी आता पाच महिने उलटल्यांनतर शुक्रवारी (२३ सप्टेंबर) आष्टी - नगर अशा ६१ किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर धावणार आहे. या वेळी रेल्वेमंत्री अश्विनकुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे आदींची उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...