आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस बजावलेल्यांवर कारवाई‎:घरकुल न बांधणाऱ्यांवर नगर परिषद‎ साेनपेठमध्ये आता कारवाई करणार‎

सोनपेठ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनपेठ शहरात नगर परिषदेच्या वतीने २६ जानेवारी ते‎ २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये प्रधानमंत्री आवास‎ योजना शहरी, वैयक्तिक घरकुल बांधणी विशेष‎ अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून‎ जे लाभार्थी यादी १, २ व ३ मधील असून ज्यांनी‎ घरकुलाचा प्रथम हप्ता घेऊन ही अद्यापर्यंत बांधकाम‎ सुरू केले नाहीत व ज्यांना दोनदा नोटीस बजावण्यात‎ आल्या आहेत, अशांवर कार्यवाही करण्यात येणार‎ असल्याचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सांगितले.‎

यादी क्रमांक १, २ व ३ मधील ज्या लाभार्थींना दोन‎ वेळेस नोटिसा बजावून अद्याप पर्यंत बांधकाम सुरू केले‎ नाही, अशा लाभार्थींविरुद्ध पुढील कारवाई म्हणून त्यांचे‎ नाव घरकुल यादीमधून वगळण्यात येऊन त्यांच्यावर‎ शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल‎ करण्यात येणार आहे. यासह व्याजासहित रक्कम वसूल‎ करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या‎ लाभार्थींना प्रथम हप्ता मिळाला आहे अश्या लाभार्थ्यांनी‎ लवकरात लवकर बांधकाम सुरू केल्यास त्यांना पुढील‎ हप्ता तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल.

तसेच यादी‎ क्र. ४ व ५ मधील ज्या लाभार्थींनी बांधकाम‎ परवानगीसाठी लागणारे कागदपत्रे जमा केले नाहीत,‎ अशा लाभार्थींनी तात्काळ कागदपत्रे जमा करावीत‎ जेणेकरुन त्यांना प्रथम हप्ता वितरीत करणे सोईचे होईल.‎ लाभार्थींनी बांधकाम सुरू करून बेसमेंट करुन‎ घेतल्यास त्यांना तात्काळ एक लाख रुपयाचा हप्ता‎ वितरीत केला जाईल.‎ जे लाभार्थी कागदपत्रे सादर करणार नाहीत अशा‎ लाभार्थींची नावे मंजूर यादीतून वळण्यात येतील याची‎ नोंद घ्यावी, असे आवाहन सोनपेठचे मुख्याधिकारी‎ विठ्ठल केदारे यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...