आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद:नागापूर सेवा सहकारी सोसायटी प्रा. टी. पी. मुंडे यांच्या गटाकडे

परळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी तालुक्यातील नागापूर सेवा सोसायटी च्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले असून हा विजय केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनत व एकजुटीमुळे शक्य झाल्याचे प्रा.टी.पी. मुंडे यांनी सांगितले.

प्रा.टी.पी.मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.या सेवा सोसायटीत नागापुर, बहादुरवाडी, डाबी, वडखेल परचुंडी या गावांचा समावेश आहे. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये अशोक ज्ञानोबा मुंडे, दीपक विश्वनाथ सोळंके ,नागोराव तुकाराम सोळंके, परमेश्वर मोतीराम सोळंके, राहुल सोळंके, रत्नमाला रामराव सोळंके,आत्माराम संभाजी मुंडे यांचा समावेश आहे.यावेळी प्रा.टी.पी.मुंडे यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी परळी मार्केट कमिटी उपसभापती प्रा.विजय मुंडे ,जि.प.सदस्य प्रदीप मुंडे, चंद्रकांत देवकते, संतोष सोळंके, संदिपान मुंडे, चंद्रकांत मुंडे, भीमराव रुपणर,जनार्दन मुंडे,शिवराज मुंडे,अंकुश मुंडे मंगेश मुंडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...