आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:नारायण राणे यांच्या मुलांना मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उपजिल्हाप्रमुख वरेकर

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत असून त्यांच्या विरोधात कोणीही जर चुकीचे बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. कारण आम्ही सहन करणारे शिवसैनिक नाहीत. आमच्यात दम आहे. आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलांना मारल्या शिवाय शांत बसणार नाहीत असे खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी शनिवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेंच्या उपस्थितीत केले.

बीड येथे शनिवारी मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत आगामी नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेची बैठक पार पडली. या वेळी बोलताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर म्हणाले की, जिल्ह्यात राणेंच्या विरोधी आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी नव्हते. आम्ही उद्धव ठाकरे यांची बदनामी सहन करणार नाही. आम्ही तीव्र आंदोलन करू मात्र सर्व आघाड्यांच्या जिल्हा प्रमुखांना आमच्या सोबत पाठवा, असेही वरेकर यांनी सांगितले.

दरम्यान, या बैठकीत शिवसेनेतील गटबाजीचे दर्शन दिसून आले. त्याच बरोबर पक्षांतर्गत खदखद बाहेर आली. या बैठकीत आष्टी तालुका प्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनी आमच्या आष्टी- पाटोद्यात शिवसेनेचा संबध आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आरोप करत आंधळं दळतंय.. आणि कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती असल्याचे म्हटले. तर, उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांनी आपल्यावर राजकीय दबावापोटी हद्दपारी झाली असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...