आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता:राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने एकहाती सत्ता ; मोगरा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी

माजलगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मोगरा सेवा सहकारी सोसायटीवर आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने एकहाती सत्ता काबीज केली असून ९ पैकी ९ उमेदवार मोठ्या फरकाने निवडणूक आले तर ४ जागा अविरोध निवडून आल्या होत्या. मोगरा सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत ४ जागा अविरोध तर ९ जागांसाठी निवडणूक पार पडली. यात ९ उमेदवार मोठ्या मतधिक्याच्या फरकाने विजयी झाले.

यामध्ये सोनाजी किसन घुमरे, गणेश दत्तात्रय चव्हाण, संजय उत्तम चव्हाण, कचरू अप्पा झेटे, एकनाथ सयाजीराव डाके, गोपाळ गंगाधरराव डाके, शिवाजी मुंजाभाऊ डाके, जनार्धन विश्वनाथ राठोड, मधुकर रामभाऊ घनघाव, संगीता कोंडीराम डाके, संजीवणीबाई सुभाष शिंदे, असेफ जमीर आतार, वैजेनाथ कारभारी जाधव यांची निवड झाली. या पॅनलचे नेतृत्व जमीर आतार, दिलीप गायके, सरपंच शाम राठोड, नारायण चोखा, बबन पवार, बाबासाहेब शिंदे, अॅड.बाबुलाल घनघाव यांनी केले. यासह सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. यावेळी प्रकाश खिस्ते, यादव घनघाव, परमेश्वर घनघाव यांनी सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ हजर होते.

बातम्या आणखी आहेत...