आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई मतदार संघातील माळापुरी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत परिवर्तन शेतकरी विकास पॅनलच्या सर्व म्हणजे १२ पैकी १२ जागांवर उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवून सेवा सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. दरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार अमरसिंह पंडित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली माळापुरीचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जील्हा चिटणीस अशोक ढास यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन शेतकरी ग्रामविकास पॅनलने सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि काँग्रेस चा सुफडा साफ करून आपली ताकत दाखवून दिली आहे.
पॅनलचे उमेदवार सर्वश्री जंगले आसाराम रामभाऊ, ठाकूर रमेशशिंग भगवानसिंग, राम साधू तिपाले, पडूळे विश्वनाथ, बेग नसीर रतन बेग, बेग निसार अमीर बेग, बेग मन्सूर चांद बेग, बेग सिकंदर अमीन बेग, सय्यद मुख्तारअली हाजी सहाब, रंगदळ विकास राजाभाऊ, गिरी सखाराम रामगिर आणि मोहन डोईफोडे हे सर्व प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवला आहे. परिवर्तन शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोसायटीच्या माध्यमातून ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राधान्याने कामे करावीत असेही ते यावेळी म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.