आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्धत:नैसर्गिक आपत्तीचा निधी ऑफलाइन पद्धतीने द्यावा

शिरूर कासार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निधी देण्यातही आला आहे परंतु हा निधी ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांना देण्याच्या निर्णयाची पद्धत चुकीची असून यासाठी मोठा वेळ जाणार आहे. करिता नैसर्गिक आपत्तीचा निधी ऑफलाइन पद्धतीने वितरित करावा या मागणीसाठी शिरूर तालुक्यातील शिवसंग्रामच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रशासनाकडून निधी वर्ग करण्यात आला आहे. हा निधी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना देण्यात येणार असून यामुळे कृषी विभागाचे पंचनामे सातबारा आठ बँक खाते आधार कार्ड यासह अनेक तत्सम कार्य पार पाडून ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना हा निधी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या चुकीच्या धोरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना ही मदत न वितरित करता ऑफलाइन पद्धतीने त्वरित नैसर्गिक आपत्ती निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा अशी मागणी शिरूर तालुक्यातील विश्वांभर शिंदे यांच्या उपस्थितीत शिवराम राऊत(शिवसंग्राम ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष शिरूर)यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राऊत व उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...