आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सव:बीड शहरात प्रथमच विनामूल्य रास रंगोली दांडिया; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. त्यामुळे महिलांना नवरात्री निमित्त घराबाहेर पडून दांडियाचा आनंद घेता आला नव्हता. मात्र आता कोरोनाचे संकट दूर झाले आहे. त्यामुळे शासनाने देखील सर्व सण साजरे करता यावेत यासाठी सर्व निर्बंध हटवल्यामुळे महिलांना त्यांचा आवडता दांडीया खेळता यावा यासाठी काल कल्पतरूच्या माध्यमातून बीड शहरातील सौभाग्य मंगल कार्यालय, पांगरी रोड येथे सायं. 06 ते 10 या वेळेत रास रंगोली दांडीया स्पर्धेचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते.

बीड शहरात कल्पतरूच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. काल देखील महिलांसाठी कल्पतरूच्या अध्यक्षा डॉ. दीपाताई‌ क्षीरसागर, सचिव डॉ. सारिका‌ क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी रास रंगीलो दांडीया 2022 चे आयोजन केले होते. त्यास बीड शहरासह परिसरातील महिलांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते देवीची आरती तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले.

विजेत्यांना बक्षीस वितरण

या स्पर्धेत पहिले बक्षिस ग्रुप दांडीया 21,000 रुपये दुसरे बक्षिस दोन महिला (जोडी) 7000 रुपये ठेवण्यात आले होते. बेस्ट मेकअप आणि ड्रेसिंग करणाऱ्या महिलांसाठी आकर्षक भेट वस्तू, छोटा गट दांडियासाठी आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.

स्पर्धेचे बक्षीस वितरण

कल्पतरू आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्यांना कल्पतरूच्या अध्यक्षा डॉ. दिपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुढच्या वर्षी देखील भव्य दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवल्याबद्दल डॉ.सारिका क्षीरसागर यांनी आनंद व्यक्त करत आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...