आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता:अंबाजोगाई येथील एनसीसी; पुनीत सागर अभियानात एनसीसी कॅडेटसुची तलाव स्वच्छता

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई येथील एनसीसी विभागाच्या वतीने पुनित सागर अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने छात्र सैनिकांनी तलावातील गाळ काढून हा उपक्रम राबवला. सध्याच्या काळात पाणी ही जागतिक समस्या झालेली आहे. स्वच्छतेचा मंत्र मुलांना देण्यासाठी हे अभियान गरजेचे आहे. पाणी विषयी जनजागरण व्हावे मुलांवर जल बचतीच्या संस्कार व्हावा. “कॅच द रेन” अभियानांतर्गत छात्रसेना विभागाच्या विद्यार्थ्यांनी एसआरटी महाविद्यालयातील तलावामधील गाळ काढणे व तलाव स्वच्छ करणे हा उपक्रम राबवला. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे.

जल हे अत्यंत पवित्र आहे ते सर्वांचे पोषण करते राष्ट्राची भरभराट करते म्हणून उज्ज्वल भविष्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे अडवणे, मुरवणे, जिरवणे गरजेचे आहे. जल ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून पुनित सागर अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आड, विहिरी, बारव तलाव व सागर किनारा यांची स्वच्छता करण्यात येते. या अभियानामध्ये मेजर एस.पी. कुलकर्णी व डॉ. राजकुमार थोरात हे छात्र सैनिकांना मार्गदर्शन करत आहेत.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वाराती महाविद्यालय परिसरातील तलावातील गाळ काढला. यात, बाजीराव गायकवाड, सुरज शिंदे, रोहन कुलकर्णी, हनुमंत घोळवे, राहुल घाडगे, व्यंकटेश दराडे, ओंकार टाकरस, मंगेश कुलकर्णी, सुशील जगदाळे, सुप्रिया साखरे, अक्षदा वेलदे, समीक्षा चौरे, पुनम साळवे, भाग्यश्री आरवडे, सोनाली मनेरे, मोनिका मिसाळ, वैष्णवी नेरकर, रोहिणी करपे, संजना यादव यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, युवकांच्या विकासासाठी एनसीसीच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात. युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांच्यात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, व्यायामाची, श्रमदानाची आवड लागावी यासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...