आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:राष्ट्रवादी ओबीसी सेलने आसोलेकरांसाठी सुरू केले टँकर!

धारूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आसोला येथील भीषण पाणीटंचाईच्या प्रश्नास टँकर मागणीच्या प्रस्तावानंतर गती आली आहे. टँकर सुरु होण्यास नियमाचे अडथळे पूर्ण होण्यास वेळ असल्याने काही दिवस ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागणार होती. या मुळे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर मुंडे यांनी स्वखर्चाने शुक्रवारी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू केले आहे. टँकरचे पाणी भरण्यासाठी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती.

धारूर शहरापासून पूर्वेस सात किमी अंतरावर आसरडोह रोडवर आसोला गाव आहे येथील तीन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असून दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असते. मागील चार वर्षांपूर्वी गावात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. त्या विहिरीतून काही अंतराने घागरभर पाणी मिळते त्या विहिरीचे ही दोन वर्षांपूर्वी कडे ढासळले आहे.

सध्या गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने ३५ फुट असलेल्या विहिरीत जीव धोक्यात घालून घागरभर पाणी घेण्यासाठी उतरावे लागते. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकर मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु मंजुरीस अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. शासकीय टँकर सुरु होईपर्यंत प्रा. ईश्वर मुंडे यांनी आ. प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी स्व खर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. टँकर गावात नेताच महिलांनी पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

पाणी विक्रीसाठी गावात खासगी टँकर येतात. ४ रुपये घागरप्रमाणे पाणी खरेदी करावे लागते. विकतचे पाणी मिळवण्यासाठीही तासन््तास ताटकळत बसावे लागत आहे. महिलांना एक किमी अंतरावरून डोक्यावरून घागरीने पाणी आणावे लागते.

बातम्या आणखी आहेत...