आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:राष्ट्रवादीतर्फे परळीत राबवणार लवकरच डोअर टू डोअर मोहीम; निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि अवघ्या काही दिवसातच कोविड महामारीने जग व्यापले, त्या काळात आपण सर्व जणांनी मिळून आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यासाठी जीवाचे रान केले. एक एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले. परंतु या काळात निर्बंधांमुळे आपल्याला सातत्याने एकमेकांना भेटता आलं नाही. त्यामुळे येत्या काही दिवसातच मी संपूर्ण परळी शहरात डोअर टू डोअर फिरून परळीकर नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहरच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रमुख नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मुंडे म्हणाले, विरोधक कमजोर आहेत, त्यांना प्रत्येक वार्डात द्यायला उमेदवार नाहीत, अशा एक ना अनेक चर्चा रंगात असतात. परळीत काही रस्त्यांची कामे अजूनही सुरू असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची देखील चर्चा असते, परंतु काम पूर्ण करताना थोडा वेळ लागतोच,या बाबींचा विचार देखील करणे गरजेचे आहे. कोविड निर्बंधांच्या काळात निधी खर्चाविषयी बंधने असल्याने व्यापक विकासकामे मर्यादित राहिली मात्र आता मोठया प्रमाणात व्यापक कामे हाती घेण्यात येत आहेत. जनतेची केलेली कामे घेऊन आपण पुन्हा त्यांच्यात जाऊ तेव्हा, निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत मत पेटीतून दिसेल आणि परळी मतदार संघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला सिद्ध होईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

या आढावा बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी केले. वैजनाथ सोळंके, बाळासाहेब देशमुख, आयुब पठाण, बाळासाहेब देशमुख, संगीता तुपसागर यांनीही आपले विचार मांडले. व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक कराड, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह जाबेर खान पठाण, प्रा. विनोद जगतकर, शिल्पा मुंडे, शकील कुरेशी, सुरेश टाक, सोफिया नंबरदार, आयुब पठाण, सय्यद सिराज, वैजनाथ सोळंके, रवींद्र परदेशी, दत्ताभाऊ सावंत, के. डी. उपाडे उपस्थित होते.

सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाचे आवेदन पत्र केले वाटप
धनंजय मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाचे आवेदन पत्र (फॉर्म) चे यावेळी पदाधिकाऱ्यांना वितरण करण्यात न.प., जि. प. व पं.स. निवडणुका प्रतिष्ठेच्या असून ताकतीने लढण्यासाठी संघटन मजबूत करण्याची गरज असल्याचे मुंडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...