आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:साळेगाव येथील सेवा सोसायटीवर पुन्हा राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व; शेतकरी कृषी विकास पॅनलने मारली बाजी

केज17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साळेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक एकतर्फी झाली असून शेतकरी कृषी विकास पॅनलने बाजी मारली. या सोसायटीवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. विरोधी आडसकर गटाच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.

केज तालुक्यातील साळेगाव, बोबडेवाडी, गांजी या तीन गावांची मिळून एक सेवा सहकारी सोसायटी आहे. या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आडसकर व सोनवणे गट आमने-सामने उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची होईल असे चित्र वाटत होते. मात्र मतदान आणि मतमोजणी करून जाहीर झालेल्या निकालावरून ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीत शेतकरी कृषी विकास पॅनलने बाजी मारली असून या पॅनलचे विद्यमान चेअरमन श्रीहरी जाधव, सय्यद नूर, धोंडिराम इंगळे, जगन्नाथ बोबडे, ॲड. बाळासाहेब मुळे, भारत बोबडे, सय्यद अलिपशा, गोरख गित्ते, अनुसूचित जाती प्रवर्गातून वैजनाथ गालफाडे, महिला प्रवर्गातून पद्मिनीबाई इंगळे, पंचफुला इंगळे, इत्तर मागास प्रवर्गातील सचिन राऊत हे मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातून बाळासाहेब गित्ते हे बिनविरोध निवडून आले आहेत. या सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

दरम्यान, बजरंग सोनवणे, सय्यद नवाब यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद नूर, श्रीहरी जाधव, अतिक शेख, शेषेराव गित्ते, बालासाहेब पारखे, रवींद्र जोगदंड, संभाजी सरवदे, पांडुरंग गित्ते, फुलचंद गित्ते, रामेश्वर शिंदे, अतिक शेख, जोतीराम बचुटे, सुभाष गालफाडे, अक्षय वरपे, बजरंग वरपे, लक्ष्मण लांडगे, अहमद शेख यांनी पॅनल निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...