आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बीड शहरामधील उर्वरित विकासकामे करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज : डॉ. योगेश क्षीरसागर

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेठ बीड भागातील भारतीय दलित पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

शहरात विकासाची अनेक कामे झाली असून राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले. पेठ बीड भागातील भारतीय दलित पॅँथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धम्मानंद वाघमारे आणि अ‍ॅड. मिलिंद वाघमारे यांनी युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी योगेश भय्यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुढे बोलताना डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, अ‍ॅड. धम्मानंद वाघमारे व अ‍ॅड. मिलिंद वाघमारे यांचे मी या विस्तारित परिवारात स्वागत करतो. यापुढे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांच्या माध्यमातून आलेले सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असेल. विकास प्रक्रियेत चळवळीतील आणि सुशिक्षीत तरुणांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. पेठ बीड भागात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत.

आगामी काळात उर्वरित विकास कामे करण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज असून पेठ बीड भागातील जो काही विकासाचा अनुशेष राहिला आहे तो भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी तालुका दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, मा.नगरसेवक भिमराव वाघचौरे, अ‍ॅड.विकास जोगदंड, गणेश वाघमारे, मंगेश जोगदंड, सखाराम मस्के, मनोज मस्के, कपिल सोनवणे, महादेव वाघमारे, मिलिंद हराळे, अनिल गोरे, गणेश हातांगळे, रितेश डोंगरे, राजू काकडे, विक्रम जाधव यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...