आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यंतर नागरिकांना नेहमीच येत असतो. असाच काहीसा प्रकार मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील माकनेर गावकऱ्यांना येत आहे. ऐन रात्रीच्या वेळी वीज पुरवठा बंद होत असल्याने ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. सततच्या या समस्येला कंटाळून काल बुधवारी रात्री ग्रामस्थांनी वीज कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावर वीज अधिकाऱ्यांनी विजेचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
मागील आठ दिवसापासुन तालुक्यातील माकनेर गावाचा रोज रात्री वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विजेबाबत त्रस्त ग्रामस्थांनी अनेकवेळा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या. परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर माकनेर येथील संतप्त झालेले ग्रामस्थ दाताळा येथील वीज कार्यालयावर धडकले. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भुमीका घेतली होती. त्यानंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने माकनेर गावाचा वीज पुरवठा सुरू करून ग्रामस्थांना दिलासा दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास खर्चे, मधुकर इंगळे, जगदीश वनारे, आशिष वनारे, अनिल वनारे, तानाजी खरसने, मंगेश सोनोने, श्रीकांत सोनोने, अमर सोनोने, अविनाश सोनोने, एकनाथ जमाले, प्रकाश वनारे, गणेश मारखेडे, अमोल चाटे, अतुल वनारे, संदीप मिरगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.