आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन:मनूर वसाहत येथे नेताजी सुभाषचंद्र बोस‎ विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात‎

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुर वसाहत येथोल नेताजी सुभाषचंद्र‎ बोस विद्यालयात इंद्रधनुष्य महोत्सवानिमीत्त तीन‎ दिवसीय विविध उपक्रम राबवण्यात आले. रक्तदान‎ शिबीरानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा‎ अविष्कार सादर करणारे ‘स्नेहसंमेलन’ उत्साहात पार‎ पडले. वैष्णवी देशमुख यांच्या सुरेल आवाजात‎ सरस्वती स्तवनाने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे‎ प्रमुख अतिथी म्हणून अनंतशास्त्री जोशी, लक्ष्मीकांत‎ देशमुख, इसरत अब्दुल सत्तार, शशीधर प्रयाग, पुष्पा‎ मुळे तसेच संस्थेचे पदाधिकारी संध्या देशमुख, राजेश‎ सुरवसे, मुख्याध्यापक कदम आदींची उपस्थिती होती.‎

संस्थेचे अध्यक्ष बप्पासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक‎ केले तर प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी‎ कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी नागरिकांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...