आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूट:नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू; कागदपत्रांसाठी सेतूमधून विद्यार्थ्यांची केली जाते लूट

आष्टी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून यासाठी विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे विविध कागदपत्रे काढण्यासाठी कडा येथील सेतू केंद्र चालक तब्बल एका कागदासाठी तीनशे ते चारशे रुपये घेत असून ही लूट थांबविण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे. शासकीय कार्यालयातून रहिवाशी प्रमाणपत्रापासून ते जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणात पैसा खर्चून आटापिटा करावा लागत असे.परंतु , शासनाने सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अतिशय कमी खर्चात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण केली आहे .

शासनाकडून सेतु सुविधा केंद्रांना विविध प्रमाणपत्र काढून देण्यासाठी दर ठरवून दिले आहेत.परंतु आष्टी व कडा येथील सेतू केंद्र चालक एक प्रमाणपत्र काढण्यासाठी तीनशे ते चारशे रुपये घेऊन विद्यार्थ्यांची अडवणूक व लूट करत आहेत.अधिकृत तीन केंद्रांना परवानगी कडा शहरामध्ये शासनाने अधिकृत तीन सेतू सेवा केंद्रांना परवानगी दिली आहे मात्र आष्टी व कडा गावाच्या बाहेरील व ग्रामीण भागातील गावांच्या नावा वरील सेतू केंद्र चालवले जात आहेत.

यामध्ये तब्बल १५ पेक्षा जास्त सेतू केंद्र चालवले जात असून या सर्व केंद्रावर विद्यार्थ्याचे दिवसाढवळ्या लूट आहे.एका विद्यार्थ्याला प्रवेशासाठी किमान पाच पेक्षा जास्त प्रमाणपत्रे काढावी लागत आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्याला दोन हजार रुपयांचा हा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे गोरगरीब विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा तरी कसा असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरपत्रकही नाहीत
नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी जातीचे प्रमाणपत्र ,रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र ,चारित्र्य प्रमाणपत्र, सातबारा ,आठ अ ,अल्पभूधारक प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागत आहेत या प्रमाणपत्रासाठी शासनाचा दर हा अत्यल्प असून कोणत्याही सेतु केंद्रांमध्ये दरपत्रक लावलेले दिसून येत नाही.

कडा शहरामध्ये अनाधिकृत सहा ते सात सेतू सेवा केंद्र आहेत हे सर्व केंद्र व आसपासच्या गावातील नावावर नोंदणी झालेले आहेत.सर्व सेतू चालकांनी विद्यार्थ्याची व शेतकऱ्यांची चालवलेली लूट थांबवावी अन्यथा चार दिवसानंतर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.तसेच कड्यातील अनधिकृत सेतु सेवा केंद्र प्रशासनाने तात्काळ त्या -त्या गावात हलवावेत. -अनिल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते

बातम्या आणखी आहेत...